बीड- तालुक्यातील नागापूर येथील दोन सख्ख्या भावांचा खून करून पसार झालेल्या एका आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बुधवारी (दि. 19 मे) दुपारी अटक केली आहे. गावालगतच एका पडक्या घरात आरोपी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
'त्या' दोन भावांचा मारेकरी पोलिसांच्या अटकेत, गावालगतच्या करत होता वास्तव्य - बीड जिल्हा बातमी
बीड तालुक्यातील नागापूर येथील दोन सख्ख्या भावांचा खून करून पसार झालेल्या एका आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बुधवारी (दि. 19 मे) दुपारी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर येथे सोमवारी (दि. 17) मध्यरात्री दोन सख्ख्या भावांचा खून झाला होता. राम व लक्ष्मण साळुंके या दोन भावांचा परमेश्वर साळुंके याने केला होता. खून केल्यानंतर परमेश्वर हा पसार झाला होता. घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी तीन पथके तयार करून परमेश्वरचा शोध सुरू केला होता. अखेर बुधवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून नदीलगतच्या एका पडक्या घरातून आरोपी परमेश्वर याला अटक केली, अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर यांनी सांगितले.
हेही वाचा -बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन भावांचा खून