महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेकपोस्ट वरून ड्युटी संपवून परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू - बीडमध्ये शिक्षकाचा अपघाती मृत्यू

जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव फाटा येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये चेकपोस्टवरून काम संपवून घरी परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्रशांत डी. कुलकर्णी असे अपघाती मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते लोणीतील शाळेत कार्यरत होते. मात्र, सध्या बीड शहरातील प्रगती विद्यालयात डेप्युटेशनवर कार्यरत होते. त्यांची नियुक्ती नगर-बीड सीमेवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्यासाठी करण्यात आली होती.

बीड अपघात न्यूज
बीड अपघात न्यूज

By

Published : Jun 15, 2020, 11:53 AM IST

बीड - जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव फाटा येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये चेकपोस्टवरून काम संपवून घरी परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. नगर-बीड सीमेवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्यासाठी संबधित शिक्षकाची नियुक्त करण्यात आली होती. या अपघातात इतर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशांत डी. कुलकर्णी असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते लोणीतील शाळेत कार्यरत होते. मात्र, सध्या बीड शहरातील प्रगती विद्यालयात डेप्युटेशनवर कार्यरत होते. त्यांची नियुक्ती नगर-बीड सीमेवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्यासाठी करण्यात आली होती. काल रात्री साडेसात वाजता ड्युटी संपल्यानंतर ते स्वत:च्या स्विफ्ट कारमधून बीड इथल्या आपल्या घरी निघाले होते. मात्र, रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

रायमोह ते शिरुर रस्त्यावरील तागडगांव फाट्याजवळ टाटा सुमो आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक झाली. यात प्रशांत कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींची नावे अद्याप समजली नाहीत. या अपघाताची भीषणता इतकी होती की, गाडी पूर्णतः चेपली आणि कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जिल्हा सीमा चेक पोस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन मिळते की नाही, हे पाहण्यासाठी रेशन दुकानावर देखील शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details