बीड- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळील दौलतवाडी येथे कार चालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी झाली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी; दाम्पत्याचा मृत्यू
पांडुरंग पांडे हे कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते. तेव्हा बीडच्या पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ दौलतवाडी येथे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात पलटी झाली. यामध्ये पांडूरंग आणि त्यांच्या पत्नी उदया यांचा मृत्यू झाला.
पांडुरंग दासराव पांडे (वय 59 रा.विजयनगर, नांदेड) उदया पांडुरंग पांडे (वय 55 रा. विजयनगर नांदेड ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात ब्रह्मानंद दासराव पांडे, प्रतीक ब्रह्मानंद पांडे यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, पांडुरंग पांडे हे कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते. तेव्हा बीडच्या पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ दौलतवाडी येथे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात पलटी झाली. यामध्ये पांडूरंग आणि त्यांच्या पत्नी उदया यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.