बीड-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या बीड पोलीस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडी अचानक रॉड तुटल्याने झाडाला धडकून पलटी झाली. यामध्ये 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे हा अपघात झाला. जखमींना माजलगाव व बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. वाहन चालक गंभीर जखमी आहे.
मोदींच्या सभेवरून बीडकडे परतणाऱ्या पोलीस व्हॅनला अपघात; 10 जखमी - police van Accident latest news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस व्हॅनचा बीडकडे परतताना अपघात झाला. गाडीचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातामध्ये चालक अशोक कदम, अमोल दयानंद राऊत, जिवा शिवाजी गंगावणे, आकाश सुदमराव यादव, भैय्यासाहेब विठ्ठलराव निसर्गने, वैजीनाथ खंडूजी तनपुरे, विजय कुंडलकर हे जखमी आहेत. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. राहुल घाडगे, सुशांत गायकवाड, शिवाजी राख हे या जखमींवर माजलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील चालक कदम हे गंभीर जखमी आहेत. जिल्हा रुग्णालयात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक, सुरेश खाडे, कुटुंब आरोग्य योजनेचे पोलीस निरीक्षक. आनंद थोरात यांनी भेट देत आरोग्य यंत्रणेस मदत केली.