महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये एबीव्हीपीचे आंदोलन - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बीड

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमताने पारित झाले आहे. आता राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्यानंतर या कायद्याची महाराष्ट्रात तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

abvp-support-to-caa-in-beed
भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये एबीव्हीपीचे आंदोलन

By

Published : Dec 22, 2019, 3:17 PM IST

बीड -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. यावेळी देशभरातून कायद्याला चुकीच्या पद्धतीने विरोध होत असल्याचे एबीव्हीपीकडून सांगण्यात आले.

भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये एबीव्हीपीचे आंदोलन

हेही वाचा - 'CAA व NRC च्या माध्यमातून राज्य आणि केंद्रात वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न'

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमताने पारित झाले आहे. आता राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्यानंतर या कायद्याची महाराष्ट्रात तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजप युवा मोर्चाचे स्वप्निल गलधर, अशोक लोढा, सर्जेराव तांदळे, अॅड. संगीता धसे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे बीड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -... म्हणून ससून रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मिळाली राख

ABOUT THE AUTHOR

...view details