बीड :शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पतीने गोळ्या खायला देऊन पत्नीचा इच्छेविरुद्ध गर्भपात ( Abortion of married woman ) केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली. विशेष म्हणजे 10 लाख रुपये हुंडा घेवून ये, अशी मागणी करत बेल्टने मारहाण करून हुंड्यासाठी छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पतीसह सासू सासऱ्यांवर संमतीशिवाय गर्भपात व कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचिता ऋषीकेश नागरगोजे रा. गजानन विहार, कालिकानगर, बीड असे पीडित विवाहितेचे नाव आहे. शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात हा सगळा प्रकार घडल्याने हुंड्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
Beed Crime : धक्कादायक, 10 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात... - विवाहितेच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात
पतीने गोळ्या खायला देऊन पत्नीचा इच्छेविरुद्ध गर्भपात ( Abortion of married woman ) केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली. विशेष म्हणजे 10 लाख रुपये हुंडा घेवून ये, अशी मागणी करत बेल्टने मारहाण करून हुंड्यासाठी छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पतीसह सासू सासऱ्यांवर संमतीशिवाय गर्भपात व कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्चशिक्षित कुटुंबातील प्रकरण -12 मे 2019 रोजी सुचिताचा विवाह ऋषीकेश नागरगोजेशी झाला. ऋषीकेश हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी आहे. सासरा भागवत दशरथ नागरगोजे जिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी असून सासू अनिता भागवत नागरगोजे शिरूर तालुक्यात जि.प. शाळेत शिक्षिका आहे. लग्नात सुचिताच्या आई-वडिलांनी सहा लाख 17 हजार 199 रुपयांचे 19 तोळे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिले होते.
तिघांविरोधात गुन्हा दाखल - सुचिता गर्भवती झाल्याचे माहित झाल्यावर ऋषीकेशने दवाखान्यात न घेवून जाता, सतत दीड महिना त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खायला दिल्या. यामुळे रक्तस्राव वाढला, त्यानतंर तिचा एका खासगी रूग्णालयात गर्भपात केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती आणि सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.