महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2019, 8:06 PM IST

ETV Bharat / state

अण्णा भाऊ साठे जयंती दिवशीच मातंग समाज बीडमध्ये काढणार आक्रोश मोर्चा

मागील अनेक वर्षांमध्ये ज्या मातंग समाजातील कुटुंबावर अन्याय झाला आहे, त्या कुटुंबातील सर्व सदस्य १ ऑगस्ट रोजी बीड येथे निघणाऱ्या या मोर्चात सहभागी होणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड- राज्यात मातंग समाजावर झालेल्या अन्याया विरोधात हा समाज एकवटला आहे. १ ऑगस्टला अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बीडमध्ये डेमोक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अजिक्य चांदणे पत्रकार परिषदेत दिली.

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांची प्रतिक्रिया

या आक्रोश मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मागील अनेक वर्षांमध्ये ज्या मातंग समाजातील कुटुंबावर अन्याय झाला आहे, त्या कुटुंबातील सर्व सदस्य १ ऑगस्टला बीड येथे निघणाऱ्या या मोर्चात सहभागी होऊन आपल्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अजिंक्य चांदणे म्हणाले की, मातंग समाजावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. तसेच समाजावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात मातंग समाज एकसंघ करून संघर्षात्मक आक्रोश सरकार समोर मांडणार आहोत. 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून हा मोर्चा दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघेल, असेही यावेळी अजिंक्य चांदणे यांनी सांगितले.

या मोर्चासाठी प्राध्यापक सुकुमार कांबळे, सुभाष लोणके यांची उपस्थिती राहणार आहे. आजवर मातंग समाजातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. एक मुलगा मंदिरात गेला म्हणून त्याच्या पार्श्वभागावर अॅसिड टाकण्याचे गंभीर प्रकार यापूर्वी राज्यात झालेले आहेत. या विरोधातच आमचा हा मोर्चा असल्याचे संयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details