महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुप्तधन शोधून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा; भोंदू महिला अटकेत

मुलाची दारू सोडवण्यासाठी आलेल्या महिलेला तुमच्या घरात गुपित धन काढून देते असे अमिश दाखवित आरोपीने महिलेला लाखो रुपयांनी गंडविले.पीडित महिलेने आत्म्ह्येचा प्रयत्न केल्याने हा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी भोंदू महिलेला अटक केली आहे.

गुप्तधन

By

Published : Jun 19, 2019, 8:35 PM IST

बीड - मुलाची दारू सोडवण्यासाठी आलेल्या महिलेला तुमच्या घरात दडलेले गुप्तधन काढून देण्याचे आमिश दाखवून लाखो रुपये गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हा प्रकार उघड झाला. खालिदाबी शिराज शेख असे या पिडितेचे नाव असून, शेख नाजियाबेगम शेख पाशा हे आरोपीचे नाव आहे. यातील भोंदू महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

गुप्तधनाच्या प्रकारणाबद्दल माहिती देताना पोलीस


बीड शहराच्या तेलगाव नाका परिसरात राहणारी शेख नाजियाबेगम शेख पाशा (वय ३५) ही महिला दारू सोडविण्याचे औषध देते अशी ख्याती होती. तिच्याकडे दारू सोडविण्याच्या औषधासाठी अनेकजण येत होते. कामखेडा (ता. बीड) येथील खालिदाबी शिराज शेख या महिलेला याची माहिती मिळाली. खालिदाबी आपल्या मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होत्या. आपल्या मुलाची दारू सुटावी यासाठी ओळखीच्या व्यक्तींमार्फत खालिदाबी नाजिया बेगमला भेटल्या.


त्यावेळी नाजिया बेगमने तुमच्या घरात गुप्तधन स्वरूपात २२ किलो सोने आहे. मी तुम्हाला ते काढून देते. त्यासाठी ४० बकऱ्यांचा बळी द्यावा लागेल आणि सोबत इतर साहित्य लागेल असे सांगितले. यावर खालिदा बेगम यांनी सुनांच्या अंगावरील दागिने आणि घरातील रोख रक्कम नाजिया बेगम हिला काढून दिली. मात्र, तिने कसलेही गुप्तधन शोधून दिले नाही.


नंतर आपली फसवणूक झाल्याच्या धक्क्याने खालिदाबी यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर हे प्रकरण उघड झाले. या संदर्भात खालिदाबी यांच्या फिर्यादीवरून नाजियाबेगम हिच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत माने अधिक तपास करत आहेत.


गुप्तधनाच्या नावावर अनेकांना फसवले -


नाजिया बेगमचा हा काही पहिला प्रकार नाही. नाजियाच्या अमिषाला यापूर्वी देखील अनेकजण बळी पडले होते. गुप्तधनाच्या लालसेने अनेकांनी नाजियाला पैसे दिल्याचे सांगितले जाते. यातील काही जणांची नवे पोलिसांना मिळाली आहेत. या व्यक्तींचे जबाब पोलीस नोंदवणार आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून फसवणुकीचा हा धंदा सुरु होता अशीही माहिती पुढे आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details