बीड - नशिबी अठराविश्व दारिद्र्य, मागच्या सात पिढ्या घरात कोणी शिकले-सवरलेले नाही. आयुष्य पालावर घालवलेली एक 38 वर्षाची महिला चक्क 17 व्या वेळी गरोदर आहे. ही धक्कादायक बाब माजलगाव तालुक्यात समोर आली आहे. 17 वेळा गर्भवती राहिलेल्या त्या महिलेला आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनासंदर्भात मार्गदर्शन का झाले नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
माजलगाव शहरातील केसपुरी कैम्प परिसरात पाल ठोकून राहणाऱ्या राजाभाऊ खरात यांच्या पत्नी लंकाबाई राजेभाऊ खरात यांच्या बाबतीत हे घडले आहे. खरात कुटूंब हे मुळचे टाकरवण येथील रहिवासी असून गावात रोजगाराचे साधन नसल्याने ते केसापुरी कॅम्प येथे पाल ठोकून राहतात. येथे राजेभाऊ खरात हे गीत गायन करतात तर, लंकाबाई या भंगार वेचण्याचे काम करुन पोट भरतात.
लंकाबाई यांची आत्ता पर्यंत सतरा बाळंतपण झाले आहेत.सद्या त्यांना 9 मुली आणि 2 मुले आहेत तर 5 मुलांचा जन्मानंतर विविध कारणांमुळे मृत्यू झाला. आता लंकाबाई 17 व्या वेळी पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. यामुळे कुटुंब कल्याणच्या नावाने जनजागृती करणारे गेले कुठे हा खरा प्रश्न निर्मान होतं आहे. या प्रकारामुळे बीडच्या आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली.
कुपोषित मुलासह ठोकली होती धूम