महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Accident :फॉर्च्यूनर गाडीने धडक दिल्याने रिक्षातील एक प्रवासी ठार, तर सात जखमी - Beed Accident

जिल्ह्यातील केज आंबेजोगाई रोडवर लोखंडी सावरगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्यूनर गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. तर, अन्य सात जण जखमी झाले आहेत. त्याच्यामध्ये चार महिलांचा समावेश असून ही घटना आंबेजोगाई केज रोडवर लोखंडी सावरगाव येथे आज मंगळवार (10 जानेवारी)रोजी रात्री सुमारास घडली आहे.

Beed Accident
फॉर्च्यूनर गाडी

By

Published : Jan 10, 2023, 11:03 PM IST

बीड : रात्री लोक आपले कामे आटवून आपल्या घराकडे जात असताना आंबेजोगाईहून प्रवासी घेऊन दिपेवडगावला निघालेला अपे रिक्षा लोखंडी सावरगाव येथील पेट्रोल पंपाजवळील फुलावर घडली. समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला होत असताना लातुरकडून भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्यूनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षातील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे. (Accident on Cage Ambejogai Road) तर, अन्य सात जण जखमी झाले आहेत. (गाडी क्रमांक MH 44 R 1212)असा आहे. यामध्ये रिक्षातील सुनील रामभाऊ कदम (वय 40 रा. दिपेवडगाव ता. केज) हे जागीच ठार झाले. तर, रिक्षातील शीला लहु कसबे ( 40) सुमन निळकंठ गुळभिले व (40) यांच्यासह चार महिला आणि चार पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details