महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Funeral for Mete जनसमुदायाकडून जड अंतकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप - Vinayak Mete

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना सोमवारी (दि 15 ऑगस्ट)रोजी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला बीड येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले Funeral for Vinayak Mete अंत्यसंस्काराला राज्यभरातून जनसमुदाय उपस्थित होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्व पक्षाचे मान्यवर उपस्थित होते

विनायक मेटे यांना अखेरचा निरोप
विनायक मेटे यांना अखेरचा निरोप

By

Published : Aug 15, 2022, 8:10 PM IST

Updated : Aug 15, 2022, 8:36 PM IST

बीड -शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे बीडहून मुंबईला जात असताना अपघाती निधन झाले होते सोमवारी सकाळी त्यांचा पार्थिव बीडमधील अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम कार्यालयात ठेवण्यात आला होता तेथूनच त्यांची अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळाकडे मार्गस्थ झाली साडेचार वाजता त्यांच्यावर जालना रोड येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला Funeral for Vinayak Mete In Beed शेवटचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय या वेळी उपस्थित होता पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेत आपल्या भावना व्यक्त केल्या

जनसमुदायाकडून जड अंतकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप

समाजाबाबतची तळमळ स्पष्ट व्हायची श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की काल आमची बैठक होती तशा सूचना दिल्या होत्या आणि ही घटना घडली मनाला वेदना देणारी घटना आहे संपूर्ण मराठा समाज हा मेंटेचा परिवार होता त्यांच्याशी सतत चर्चा व्हायची यात त्यांचा एकच हट्ट असायचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यातून त्यांची समाजाबाबतची तळमळ स्पष्ट व्हायची अशी माणसे दुर्मिळ असतात यांनी सातत्याने मराठा समाजासाठी संघर्ष केला त्यांचा हा लढा व्यर्थ जाणार नाही हा शब्द मी देतो असे ते म्हणाले

त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाऊ मेटे यांना श्रद्धांजली वाहताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की आज शब्द सुचत नाहीत त्यांची अन माझी मैत्री होती माझी वैयक्तिक हानी झाली आहे नेहमी आमची भेट व्हायची यात त्यांनी स्वतः साठी काही मागितले नाही प्रत्येकवेळी समाजाचे विषय ते मांडायचे आणि मार्गी लावण्यासाठी धडपड करायचे स्वतःच्या भरवश्यावर हे नेतृत्व उभे राहिले त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली त्यांनी हाती घेतलेले काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाऊ असेही ते म्हणाले

मान्यवरांची उपस्थिती या वेळी अंत्यविधीला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे खासदार प्रीतम मुंडे खासदार इम्तियाज जलील राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार मंत्री अतुल सावे राधाकृष्ण विखे पाटील तानाजी सावंत गिरीश महाजन आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रकाश सोळुंके माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री अशोक पाटील माजी मंत्री राजेश टोपे हरिभाऊ बागडे आमदार भारतीताई लव्हेकर आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस आमदार लक्ष्मण पवार आमदार प्रदीप जैस्वाल आमदार श्वेता महाले सदाभाऊ खोत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव माजी मंत्री सुरेश नवले माजी आमदार सुनील धांडे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप भीमराव केराम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा मराठा आरक्षण राज्य समन्वयक विनोद पाटील माजी मंत्री बदमराव पंडित अर्जुन खोतकर इत्यादी उपस्थित होते

अंत्ययात्रेत प्रचंड गर्दीशिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांची अंत्ययात्रा बीड येथील शिवसंग्राम भवन येथून दुपारी एक वाजता मार्गस्थ झाली नगर रोड छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा सह शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत होती फुलाने सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचा पार्थिव ठेवण्यात आला होता अंत्ययात्रेत बीड जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते स्नेही बीडमध्ये दाखल झाले होते जालना रोडवरील त्यांच्या शेतात अंत्ययात्रेचा शेवट झाला अंत्ययात्रेत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता अमर रहे अमर रहे विनायक मेटे अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या

बीड जिल्हा कडकडीत बंदविनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण बीड जिल्हा शोकाकूल आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला संपूर्ण बाजार पेठा सकाळपासूनच बंद होत्या ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर विनायक मेटे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

हेही वाचा -vinayak mete death मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे विनायक मेटे कोण होते जाणून घ्या

Last Updated : Aug 15, 2022, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details