गेवराई (बीड)शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मिरकाळा गावाच्या परिसरात असलेल्या पालख्या डोंगराला भिषण आग लागली. कडक उन आणि वाऱ्यामुळे या आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक झाडे जळून खाक झाली आहेत, तसेच याच परिसरात शेतकऱ्याने जनवारासाठी ठेवलेला चार देखील जळून खाक झाला आहे.
गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी, मानमोडी, वडगाव ढोक, मिरकाळा, मुळूकवाडी हे गावे डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात शेतकीर आपल्या शेतातील पाला-पाचोळा पेटून देतात, यातूनच डोंगराला आग लागल्याची घटना घडली असावी असा अंदाज आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ही आग लागली.