बीड - भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना परळी तालुक्यात उघडकीस आली. चुलत भावाने दिव्यांग बहिणीवर बळजबरीने अत्याचार केला. ५ फेब्रुवारीची ही घटना असून आरोपी फरार आहे.
हेही वाचा -बीड: स्पोकन इंग्लिशच्या क्लासकरता गेलेल्या तरुणीची पुण्यात आत्महत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामीण ठाणे हद्दीतील ३० वर्षीय पीडित तरुणी दिव्यांग आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ती आपल्या घरी होती. यावेळी तिचा चुलतभाऊ घरात शिरला. त्याने सुरुवातीला तिची छेड काढली व नंतर बळजबरीने तिच्यावर अत्याचार करून पसार झाला. पीडितेने घडला प्रकार कुटुंबाला सांगितला. त्यानंतर कुटुंबाने ग्रामीण ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे करत आहे.