बीड -दिवसभर शेतात काबाडकष्ट करुन सायंकाळी घराकडे परतत असलेल्या बैलगाडीला एसटी बसने धडक दिल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार झाला आहे. ही घटना सिरसाळा तेलगाव रोडवरील खामगाव फाटीनजीक झाली आहे.
बीडमध्ये बसची बैलगाडीला धडक, शेतकऱ्यासह एक बैल ठार - बीडमध्ये बसची बैलगाडीला धडक
बैलगाडी चालक शेतकरी संदिपान लक्ष्मण केकान (रा. केकानवाडी ता. धारुर, हल्ली मुक्काम तपोवन ता. परळी वैद्यनाथ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यासोबत एक बैल देखील जागीच ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

बैलगाडी चालक शेतकरी संदिपान लक्ष्मण केकान (रा. केकानवाडी ता. धारुर, हल्ली मुक्काम तपोवन ता. परळी वैद्यनाथ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यासोबत एक बैल देखील जागीच ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ७ :१५ वाजताच्या दरम्यान घडली. बस क्रमांक एम. एच. १४ बीटी ४४४९ त्रंब्यकेश्वर ते परळी जात असतांना खामागावजवळ या बसने बैलगाडीला माघून धडक दिली. या घटनेने सिरसाळा, खामगाव, तपोवन परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!