महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळकरी विद्यार्थ्याचे अंबाजोगाईत अपहरण, गुन्हा दाखल - अपहरण

अजय सध्या खोलेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो एका खासगी अभ्यासिकेत गेला होता. सायंकाळ झाल्यावरही घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात अजयचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली.

kidnap
शाळकरी विद्यार्थ्याचे अंबाजोगाईत अपहरण, गुन्हा दाखल

By

Published : Feb 22, 2020, 7:27 PM IST

बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अभ्यासिकेत गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची घटना शनिवारी घडली. अजय उर्फ बबलू कृष्णा मुंडे (रा. गांजपूर, ता. धारूर) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हेही वाचा -दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची वर्षावर तातडीची बैठक, शरद पवारांसह अजित पवारांची उपस्थिती

अजयचे वडील कृष्णा बापुराव मुंडे हे शेतकरी आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी हे कुटुंब अंबाजोगाईत खडकपुरा भागात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. अजय सध्या खोलेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो एका खासगी अभ्यासिकेत गेला होता. सायंकाळ झाल्यावरही घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात अजयचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश सोळंके करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details