बीड:16 वर्षीय अल्पवयीन मुलाची गावातील लाईट बंद करून, भरचौकात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक अन् खळबळजनक घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे. सुरज श्रीकृष्ण शिंदे वय 16 असे अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
Beed Crime : 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करत भरचौकात हत्या - हल्लेखोरांनी पळ काढला
Beed Crime: 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची, गावातील लाईट बंद करून, भरचौकात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे.
हल्लेखोरांनी पळ काढला: मयत श्रीकृष्ण शिंदे हा रात्री आठच्या दरम्यान घराबाहेर आला होता. यादरम्यान गावातील लाईट बंद करून, भर चौकात कृष्णावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहे. यावेळी गावातील लोकांनी आरडा- ओरोड केल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. त्यानंतर रक्तबंबाळ अन् गंभीर जखमी असणाऱ्या कृष्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात येत होतं.
प्राथमिक माहिती समोर: मात्र वाटतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर घरगुती वादातून मयत कृष्णाच्या चुलत भावानेचं खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान वडवणी पोलिसांनी संशयित चुलत भावास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.