महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विळखा म्यूकरमायकोसिसचा : बीडमध्ये 45 वर्षांपुढील रूग्ण सर्वाधिक; उपचारासाठी मिळेना तज्ज्ञ - beed breaking news

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 96 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 45 ते 60 वयोगटातील 30 तर साठ वर्षांच्या पुढील 37 रुग्णांचा समावेश असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 29, 2021, 9:16 PM IST

Updated : May 29, 2021, 9:32 PM IST

बीड- कोरोनाच्या संकटानंतर 'पोस्ट कोविड' आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. यामध्ये म्यूकरमायकोसिसचा आजार दिवसेंदिवस हातपाय पसरवत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये वय वर्ष 45 ते 60 वर्षांच्या पुढील नागरिकांना म्यूकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 96 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले आहेत. यामध्ये 45 ते 60 वयोगटातील 30 तर साठ वर्षांच्या पुढील 37 रुग्णांचा समावेश असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी दिली.

बातचित करताना प्रतिनिधी

बीड जिल्हा रुग्णालयात मात्र म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक अद्यापपर्यंत उपलब्ध नाही. नवीन पद भरती झाल्यानंतरच निरो सर्जन, कान, नाक, घसा तज्ज्ञ व दंत रोग तज्ज्ञ यांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापुढे जाऊन सध्याची उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, बीड जिल्हा रुग्णालय प्रशासन काही खासगी डॉक्टरांशी याबाबत चर्चा करत असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते यांनी सांगितले.

वयोगटानुसार बीड जिल्ह्यातील रुग्ण

18 वर्षांपेक्षा खालील वयोगटातील एक रुग्ण आढळला आहे.

18 ते 45 वर्षे वयोगटातील 21 रुग्ण

45 ते 70 वर्षे वयोगटातील 67 हून अधिक रुग्ण

बीड जिल्हा रुग्णालयाला मिळेनात तज्ज्ञ डॉक्टर

बीड जिल्हा रुग्णालयात अद्यापपर्यंत म्यूकरमायकोसिसच्या रुग्णासाठी विशेष वार्ड तयार झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण म्यूकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर लागतात. यामध्ये न्यूरो सर्जन, दंतरोग तज्ज्ञ, त्याचबरोबर कान, नाक, घसा तज्ज्ञांची गरज असते. मात्र, ही पदे बीड जिल्हा रुग्णालयात रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात विशेष वार्ड तयार करण्यासाठी अगोदर पदभरती करावी लागणार असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते म्हणाले, यासाठी काही खासगी डॉक्टरांना ऑपरेशनसाठी कॉलवर बोलता येईल का, याचा देखील जिल्हा रुग्णालय प्रशासन विचार करत आहे.

हेही वाचा -बीडमध्ये कोसळल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; सखल भागात साचले पाणी

Last Updated : May 29, 2021, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details