बीड- बोलेरो आणि ट्रकच्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वैधकिन्ही येथे घडली आहे. हा अपघात आज सकाळी घडला. अपघातात ठार झालेले सर्व मृत हे पाटोदा तालुक्यातील निवडुंगवाडी येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बीडजवळ बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात.. दोन महिलांसह ७ जण ठार - niwdunggwadi Resident Bolero Accident News
बोलेरो आणि ट्रकच्या अपघातात ७ जण ठार झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील वैधकिन्ही येथे घडली आहे. हा अपघात आज सकाळी घडला.
![बीडजवळ बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात.. दोन महिलांसह ७ जण ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5026177-thumbnail-3x2-op.jpg)
वैधकिन्ही येथे बोलेरो-ट्रक अपघातात सात ठार
अपघातात ठार झालेल्या मृतांचे दृश्य
बोलेरो गाडीने उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार सात जण ठार झाल्याचे समजले आहेत. बोलेरोतील लोक नातेवाईकांची दारू सोडविण्यासाठी जात होते, त्या दरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती समजली आहे. मृतांमध्ये वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मंडे, केसरबाई बन्सी मुंडे व अन्य चौघे सर्व (रा. निवडुंगवाडी ता.जि.बीड) यांचा समावेश आहे.