महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर-अहमदपूर रोडवर कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात; 5 ठार - बीडमध्ये अपघात

Beed Accident News : अहमदनगर-अहमदपूर या महामार्गावर नेकनूरजवळील ससेवाडी येथे नऊ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली.

Accident In Beed
भीषण अपघात, 5 ठार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 11:01 PM IST

बीड Beed Accident News :कंटेनर आणि पिकअप अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गाड्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम केलं असून, यामध्ये पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

मृतांची नावे खालीलप्रमाणे :

१) प्रल्हाद सिताराम घरत, वय ६३, रा.महाजनवाडी ता.जि.बीड
२) नितिन प्रल्हाद घरत, वय ४१, रा.महाजनवाडी ता जि.बीड
३) विनोद लक्ष्मण सानप, वय ४०, वर्ष रा.वाघिरा ता.पाटोदा जि.बीड
यासह कंटेनरमधील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण 5 जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा:

  1. आमची निष्ठा देशासाठी, तर काहींची कुटुंबासाठी; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
  2. सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींचं युवकांना आवाहन
  3. भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मिळो; गोदामाईच्या साक्षीनं पंतप्रधान मोदींचा संकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details