महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्हा बँक निवडणूक: आठ जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ १६ व्यक्तींनी आपली उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आता ८ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यात भाजच्या गटातून मोठ्याप्रमाणावर बंडखोरीचे चित्र आहे.

Beed District Bank
बीड जिल्हा बँक

By

Published : Mar 10, 2021, 9:53 PM IST

बीड - येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ १६ व्यक्तींनी आपली उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आता ८ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यात भाजच्या गटातून मोठ्याप्रमाणावर बंडखोरीचे चित्र आहे. जवळपास सर्वच मतदारसंघात भाजपशी संबंधित उमेद्वारांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे निवडणुकीचे वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील तब्बल ११ जागा रिक्त राहणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बँकेच्या केवळ ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीनंतर या ८ संचालकांना कारभार पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता धूसर असली तरी निवडणुकीत मात्र चुरस निर्माण झाली आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६ व्यक्तींनी माघार घेतली , त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या ८ मतदारसंघात मिळून ४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सर्वात कमी उमेदवार महिला राखीव मतदारसंघात (२ जागांसाठी ३ ) तर सर्वाधिक उमेदवार विमुक्त जाती प्रवर्गात (१ जागेसाठी १० ) आहेत. इतर शेती संस्था (९ ), नागरी बँका पतसंस्था (७ ) कृषी पणन संस्था (३ ), ओबीसी (४) तर अनुसूचित जाती मतदारसंघात ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आदित्य सारडाची माघार-

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून यावेळी विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतली आहे. त्यांनी नागरी बँका मतदारसंघातून अर्ज भरला होता. आदित्य सारडा २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा जिल्हा बँकेवर निवडून आले होते आणि अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून ते अध्यक्ष आहेत . आदित्य सारडा यांच्या माघारीमुळे १९९५ नंतर प्रथमच जिल्हा बँकेत सारडा कुटुंबातील कोणी असणार नाही.

हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग

ABOUT THE AUTHOR

...view details