बीडबीड जिल्ह्यात 360 रस्ते अपघातात 296 जणांचा बळी गेला ( 360 Road Accidents in Two Years in Beed District ) आहे. तर 140 जण अतिगंभीर त्यामध्ये दुचाकीस्वार सर्वाधिक जखमी झाले ( 296 People Died, While 140 were Seriously Injured ) आहेत. त्याचबरोबर सुसाट वेगाने चालणारे तरुण व सुसाट वेगाने चालणारे चारचाकी वाहनचालक यांनाही ब्रेक लागणार का आणि आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव जाणार नाही याची वाहनचालक काळजी घेणार का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात कोणती जीवघेणी ठिकाणे, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहेत, तर त्या ठिकाणी किती जणांचे अपघात झाले व किती जणांचे बळी गेले याचे धक्कादायक वास्तव Etv Bharat आपल्यासमोर मांडत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांत 360 अपघातबीड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांत 360 अपघात झाले आहेत, तर याच अपघातात 296 लोकांचे बळी गेले आहेत, तर त्यामध्ये अतिगंभीर 279 लोक असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारासह चारचाकी वाहनचालकांनीही आपले वाहन व्यवस्थित चालवावे असेच आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या क्रमानुसार ठिकाण अपघात-मयत-जखमी
*महत्त्वाची टीप : ठिकाण अपघात-मयत-जखमी या क्रमाने सर्व सूची पाहावी*
1) बीड तालुका
1) मांजरी फाटा- 6 6 5, 2) मांजरसुंबाघाट- 10 12 10, 3) संभाजी चौक 11 14 5, 4) पांगर बावडी- 6 11 4, 5) पाली- 5 5 0, 6) ढेकणमोहा- 3 2 3
एकूण-. 101. 50 27,