महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्हा रुग्णालयातील 3 परिचारिकांचा 'परिचारिका गौरव' पुरस्काराने सन्मान

येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तीन परिचारिकांचा 'परिचारिका गौरव' या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील 3 परिचारिकांचा 'परिचारिका गौरव' पुरस्काराने सन्मान

By

Published : May 20, 2019, 1:05 PM IST

बीड- येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तीन परिचारिकांचा 'परिचारिका गौरव' या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. मंदाकिनी खैरमोडे, शीला मुंडे, शीला बनसोडे अशा या तीन परिचारकांची नावे आहेत. अहमदनगर येथील मॅक्स केअर ग्रुपच्यावतीने रविवारी अहमदनगरमध्ये हा पुरस्कार देण्यात आला.

अहमदनगर येथील मॅक्स केअर ग्रुपच्यावतीने परिचारिका दिनाच्या दिवशी अनेक वर्षे केलेल्या रुग्णसेवेबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला होता. बीड जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षे केलेल्या रुग्णसेवेची दखल घेऊन या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर पंकज वंजारे, डॉ. मोहम्मद माजिद, डॉ. सतीश सोनवणे, प्रशांत पठारे, डॉक्टर सुदाम जरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details