बीड : 26 वर्षीय युवकाचा (26 year old youth) हृदय विकाराने मृत्यु (died of heart failure) झाल्याची ह्रदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात (living at Ambajogai in Beed district) उघडकीस आली. 18 डिसेंबरला एकुलत्या एका मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाने तयारी सुरू होती. नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले गेले, पण नवरदेव असलेल्या धीरज वसंत तट (Dheeraj Vasant Tat) याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि यातच उपचाराला घेवून जात असतांना, त्याचा मृत्यू झाला. youth died of heart failure
Youth Died Heart Failure : ज्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं, त्याच्याच अंत्यविधीसाठी यावं लागण्याची दुर्दैवी वेळ - धीरज वसंत तट
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे राहणाऱ्या (living at Ambajogai in Beed district) 26 वर्षीय (26 year old youth) युवकाचा हृदय विकाराने मृत्यु (died of heart failure) झाला. 18 डिसेंबरला या मुलाचा विवाह होता. आणि अगदी काही दिवसांपुर्वीच मृत्यू झाल्याने सर्वेत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. youth died of heart failure
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळाले, त्याच्याचं अंत्यविधीसाठी यावं लागण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात आपेगाव येथील तट कुटुंब वास्तव्यास आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या धीरज वसंत तट या एकुलत्या एका मुलाचं लग्न जमलं होतं. लग्नाचं मुहूर्त 18 डिसेंबरला निघालं होतं. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरात लगीन घाई सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. काही नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पोचले होते. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होतं. धीरज यांना तीव्र ह्दय विकाराचा झटका आला. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळळा असून; सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. youth died of heart failure