महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये 23 वर्षीय तरुणाचा खून; कारण अस्पष्ट - बीड पोलीस बातमी

बीडपासून काही अंतरावर असलेल्या पिंप्री फाटा येथील एका रस्त्याच्या कडेला एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे.

23-year-old-man-stabbed-to-death-in-bee
बीड: 23 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून; कारण अस्पष्ट

By

Published : Nov 6, 2020, 7:44 PM IST

बीड - बीड तालुक्यातील नागापूर येथे शुक्रवारी दुपारी 23 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. नेमका खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला, याचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर यांनी सांगितले आहे.

राजेंद्र अशोक खराडे (२३) रा. नागापूर बुद्रुक हा तरुण गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडला होता. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह बीडपासून काही अंतरावर असलेल्या पिंप्री फाटा येथील एका रस्त्याच्या कडेला आढळला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराच्या जखमा होत्या. शिवाय पोटावर, हातावर आणि पाठीवर वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा केला. या तरुणाचा कोणी खून केला आणि कशासाठी केला, याचा अधिक तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

तपासासाठी पथक-

नागापूर बुद्रुक येथील घडलेल्या खुनाच्या घटनेमध्ये कोणाचा हात आहे याचा तपास पिंपळनेर पोलीस करत आहे. या खुनाच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून लवकरच तपास लागेल, असे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details