बीड- खरीप हंगाम 2021- 22 करीता पिक कर्ज वाटप सुरू झाले आहे. यावर्षी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला 208 कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. 44 हजार शेतकऱ्यांना या कर्ज वाटपाचा लाभ होणार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सी. ठोंबरे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 558 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.
बीड: पीककर्ज वाटपाचे 208 कोटी उद्दिष्ट; 44 हजार शेतकऱ्यांना होणार पीक कर्जाचे वाटप - Peak loan allocation
गतवर्षी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने 175 कोटी बारा लाख रुपये एवढे खरीप पीककर्जाचे वाटप केले होते. यावर्षी शेतकऱ्यांना गतवर्षीच्या कर्जावर दहा टक्के वाढीव कर्ज देण्याचा निर्णय बीड जिल्हा बँक प्रशासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यात एकूण जिल्हा बँकेचे आठ लाख एवढे शेतकरी खातेदार आहेत.
पीककर्जासाठी ऑनलाईन अर्ज
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाने यावर्षी 208 कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 30 जून 2021पर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून पीककर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँक प्रशासनाने केले आहे.
यंदा मिळणार दहा टक्के वाढ
गतवर्षी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने 175 कोटी बारा लाख रुपये एवढे खरीप पीककर्जाचे वाटप केले होते. यावर्षी शेतकऱ्यांना गतवर्षीच्या कर्जावर दहा टक्के वाढीव कर्ज देण्याचा निर्णय बीड जिल्हा बँक प्रशासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यात एकूण जिल्हा बँकेचे आठ लाख शेतकरी खातेदार आहेत. बीड जिल्हा बँक प्रशासन स्वतः ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन मिळवणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोरोनाच्या बिकट काळात तहसील कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सी. ठोंबरे व उबाळे यांनी दिली.