बस आणि रिक्षाच्या अपघातात बाप लेकांचा जागीच मृत्यु - बस आणि रिक्षाच्या अपघातात दोन जण ठार
बीड-केज- मांजरसुंबा मार्गावर अंबाळाचा बरड आहे. येथून जवळच असणाऱ्या सारूळ पाटी येथे औरंगाबाद-लातूर एसटी बस आणि ॲपे रिक्षा यांच्यात अपघात झाला. दरम्यान झालेल्या अपघातात रिक्षातील दोघे जण ठार झाले आहेत.
बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई केज मार्गावरील सारूळ पाटी येथे शुक्रवारी रात्री एसटी बस आणि ॲपे रिक्षाची समोरासमोर धडक झाली. सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून यात बाप लेकांचा जागीच मृत्यु झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना केज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
बीड-केज- मांजरसुंबा मार्गावर अंबाळाचा बरड आहे. येथून जवळच असणाऱ्या सारूळ पाटी येथे औरंगाबाद-लातूर एसटी बस आणि ॲपे रिक्षा यांच्यात अपघात झाला. दरम्यान झालेल्या अपघातात रिक्षातील दोघे जण ठार झाले आहेत. विक्रम अनवणे आणि दत्ता अनवणे असे अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे आहेत. रिक्षा चाकरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एसटीचे चालक आणि वाहक फरार झाले आहेत. जखमींवर केज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.