महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये बुधवारी दोन कोरोनाच्या रुग्णांना देणार डिस्चार्ज - बीड कोरोना अपडेट

सुरुवातीच्या काळात बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, पुणे-मुंबई येथून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. सद्यस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

beed corona positive patients  beed corona update  beed corona positive total count  बीड कोरोना पॉझिटिव्ह केसेस  बीड कोरोना अपडेट  बीड कोरोनाबाधितांची संख्या
बीडमध्ये बुधवारी दोन कोरोनाच्या रुग्णांना देणार डिस्चार्ज

By

Published : May 26, 2020, 5:51 PM IST

बीड -जिल्ह्यात आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकीच २ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले. त्यामुळे बीडकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

बीडमध्ये बुधवारी दोन कोरोनाच्या रुग्णांना देणार डिस्चार्ज

सुरुवातीच्या काळात बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र, पुणे-मुंबई येथून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. सद्यस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीत बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे म्हणजे उपचार सुरू असलेले सर्व रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. या एकूण रुग्णांपैकी दोन रुग्ण बुधवारी बरे होऊन घरी जातील, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details