महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये दोन बोगस डॉक्टर जेरबंद, वैद्यकीय परवान्याशिवाय करत होते रुग्णांवर उपचार - बीड बोगस डॉक्टर ताब्यात

दोघेही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना दवाखाने थाटून पाचेगाव येथे रुग्ण तपासणी व उपचार करत असल्याच्या तक्रारी होती.

bogus doctor arrested in gevrai beed
बीडमध्ये दोन बोगस डॉक्टर जेरबंद

By

Published : Apr 13, 2020, 10:07 AM IST

बीड- गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दोन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला. शनिवारी वैद्यकीय अधिकारी व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

श्रीमंत बाबूलाल मेहता (४७,चकलांबा ता. गेवराई), विठ्ठल गुलाब राठोड (३३, रा. लोणाळा ता. गेवराई) अशी त्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. ते दोघेही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना दवाखाने थाटून पाचेगाव येथे रुग्ण तपासणी व उपचार करत असल्याच्या तक्रारी होती. त्यावरुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, पाचेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय माने, गेवराई ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप काळे यांनी शनिवारी छापा टाकला. यावेळी दोघेही रुग्ण तपासणी करताना आढळले. त्यांच्याकडील वैद्यकीय साहित्य, औषधी ताब्यात घेतले आहे. डॉ. धनंजय माने यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

ABOUT THE AUTHOR

...view details