बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने 262 जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. याचा अहवाल बुधवारी आला. यातील 262 पैकी 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आता 62 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
बीडमध्ये बुधवारी 17 नवीन कोरोनाबाधितांची नोंद; 62 जणांवर उपचार सुरू - beed corona cure patients
दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी आढळून आलेल्या नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील - 6, अंबाजोगाई - 3, परळी - 6 तर गेवराई तालुक्यातील - 2 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या 262 पैकी 17 पॉझिटिव्ह 7 अहवाल अनिर्णित आहेत. जिल्ह्यातील परळी तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीला परळीत तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 18 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढत आहे.