बीड - स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एकूण १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या २००४ पासून हे प्रकरण सुरू आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी जिल्हा रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयातील १७ कर्मचारी बडतर्फ
१७ कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भानुदास एकनाथ उगले, बबन वनवे, सुखदेव वनवे, महारुद्र भागवत वडमारे, द्वारका विश्वास नागरगोजे, परमेश्वर भानुदास जगताप, तुकाराम सूर्यभान जगताप, संगीता विठ्ठल मुळे, महारुद्र वनवे, तात्यासाहेब, लक्ष्मण सांबरे, अशोक नानाभाऊ, अडसूळ प्रकाश, रघुनाथ घाडगे, सुंदरराव दत्तात्रय फडके, युवराज रघुनाथ शिंदे, प्रल्हाद भिमराव गरकळ आणि हनुमंत ज्ञानोबा तुपे यांचा समावेश आहे. या १७ कर्मचाऱ्यांवर शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.