महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Crime: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल - 2 वेळा त्याने अत्याचार केले

Beed Crime: शिक्षणासाठी बीडमध्ये शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या 16 वर्षीय पीडितेला वसतिगृहातून दुचाकीवरून बाहेर लॉजवर नेऊन 2 वेळा त्याने अत्याचार केले आहे.

Beed Crime
Beed Crime

By

Published : Nov 13, 2022, 12:45 PM IST

Updated : Nov 13, 2022, 1:10 PM IST

बीड: वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीला स्थळ आले होते. पसंती झाली...पण हुंडा देण्या- घेण्यावरून लग्न मोडले होते. मात्र, लग्न मोडल्यावरही तरुणाने मुलीचा पिच्छा सोडला नाही. शिक्षणासाठी बीडमध्ये शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या 16 वर्षीय पीडितेला वसतिगृहातून दुचाकीवरून बाहेर लॉजवर नेऊन 2 वेळा त्याने कुकर्म केले आहे.

नेमकं काय घडल:तिसऱ्यांदा गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे एका शेतात नेले व बळजबरी केली होती. मुलीने आधी लग्न करू असे सांगितल्यावर शिवीगाळ करत तिला एकटीला सोडून त्याने पलायन केले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडे:दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सचिन सुभाष राठोड रा. टाकरवण, ता. माजलगाव याच्यावर बीड शहरातील पेठ बीड ठाण्यात बलात्कार विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Last Updated : Nov 13, 2022, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details