आष्टी ( बीड) - परिसरात 16 कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याची घटना शनिवारी खिळद गावात घडली. मागील महिनाभरापासून शिरापूर, सराटे वडगांव, ब्रम्हगांव, पांगुळगव्हाण येथे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्यू झाला. आता खिळद येथे कोंबड्या दगावल्याचे समोर आले. तालुक्यातील कोंबड्यांचे मृत्यू सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये बर्ड फ्लूची भिती निर्माण झाली आहे.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जे यांच्या परसातील 16 कोंबड्या शनिवारी दगावल्या. आजवर तालुक्यात अनेक पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू धास्ती असली तरी, आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण खिळद येथे मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमके कशाने झाला हे अहवाल आल्यावरच समजेल.