बीड- साधारणत 2015 मध्ये बीड जिल्हा बँक ठेवीदारांचे पाच हजार रुपये परत करू शकत नव्हती, अशी परिस्थिती होती. पूर्वीच्या लोकांनी केलेले घोटाळे व इतर बाबींमुळे जिल्हा बँक शेतकर्यांसाठी असतानाही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नव्हता. मात्र, बँकेने पुन्हा विश्वासार्हता मिळवत 45 हजार शेतकऱ्यांना 155 कोटी रुपये पीक कर्ज यंदा वाटप केले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे अर्ज केलेला नाही. त्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे अर्ज करून तत्काळ पीक कर्ज मिळवावे, असेही आवाहन सारडा यांनी शेतकऱ्यांना केले.
बीड जिल्हा बँकेसमोर पैसे मागण्यासाठी लागलेल्या ठेवीदारांच्या, शेतकऱ्यांच्या रांगा व कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झालेली जिल्हा बँक पूर्णतः रसातळाला गेली होती. मात्र, मागच्या तीन वर्षात पुन्हा बँकेने शेतकऱ्यांची विश्वासार्हता मिळवत बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. 2020 मध्ये शासनाकडून बीड जिल्हा बँकेला शंभर कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँक प्रशासनाने शासनाच्या उद्दिष्टापेक्षा 55 टक्के अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केल्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेबाबत विश्वासार्हता निर्माण होत आहे. यंदा 155 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक कर्ज दिले - आदित्य सारडा