बीड - जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या सगळ्या परिस्थितीत कोरोनाव्यतिरिक्त आजारांच्या रुग्णांना मिळत असलेल्या उपचाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. न्युमोनिया, सारी याबरोबरच अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात व शासकीय रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाशिवाय इतर आजारांमुळे मागील तीन-चार महिन्यात दीडशे जणांचा मृत्यू बीड जिल्ह्यात झाला आहे. आता साडेआठ हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत.
कोरोना आजाराशिवाय इतर आजारांच्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. डॉ. ओव्हाळ यांचे म्हणणे आहे की, दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयात रमेश कांबळे नावाचा व्यक्ती न्युमोनियामुळे दगावला. त्याला आवश्यक ती प्राथमिक आरोग्य सेवा मिळाली नसल्याचा आरोप डॉ. ओव्हाळ यांनी यावेळी केला आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या