महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला बलात्कार; शिरूर कासार तालुक्यातील घटना - बीड लेटेस्ट न्यूज

चुलत्यानेच तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील पौंडूळ येथे सोमवारी रात्री घडली आहे.

13 year old girl physically abused by her uncle in beed district
तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला बलात्कार; शिरूर कासार तालुक्यातील घटना

By

Published : Sep 8, 2020, 1:48 PM IST

बीड -चुलत्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील पौंडूळ येथे सोमवारी रात्री घडली आहे. ही मुलगी तेरा वर्षांची असूनया प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार नराधम चुलत्याचा शोध पोलीस घेत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी, पौंडूळ येथील तेरा वर्षांची मुलगी किराणा साहित्य आणण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी तुला तुझ्या आजी-आजोबांनी बोलावले आहे. असे सांगून तिला तिच्या चुलत्याने डोंगरावर बोलावून घेतले. ही मुलगी डोंगरावर गेली असता, आजूबाजूला कोणीच नसल्याचे पाहून चुलत्याने तिच्यावर बलात्कार केला.

घरी आल्यानंतर पीडित मुलीने घडलेली हकीकत घरच्यांना सांगितली. त्यानंतर घरच्यांनी मुलीसह शिरूर पोलीस स्टेशन गाठले. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळू भीमा पवार या आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी बाळू पवार फरार आहे.

हेही वाचा -अग्निशमन दलाकडून बेपत्ता तरुणाचा बिंदुसरा धरणामध्ये शोध सुरू

हेही वाचा -मुंडे हॉस्पिटलवरील छाप्यात समोर आलेली परिस्थिती आश्चर्यकारक; जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details