बीड: जिल्ह्याच्या शाळा व्यवस्थापनामध्ये जिल्ह्यात एकूण 5 लाख 79हजार 509 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 5 लाख 68 हजार 294 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 11 हजार 215 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे बाकी आहे. आधार कार्ड काढलेले आणि त्यांची टक्केवारी पकडली तर ती 98.06 टक्के आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी मार्च 23 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये थोडी चूक झालेली आहे. अशा 79 हजार 913 विद्यार्थ्यांची ती दुरुस्ती कंपनीकडे सोपवलेली आहे.
Students Without Aadhar Card: बीड जिल्ह्यातील 11 हजार 215 विद्यार्थी आधार कार्ड विना...! शिक्षणाऐवजी ऊसाच्या फडात कामाला... - Students Without Aadhar Card
ऊसतोडणीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बोगस असल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात 79 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ना दुरुस्त आहेत. तर 11 हजार 215 विद्यार्थ्याचे आधार कार्डच तयार झालेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. बीड जिल्ह्याची ख्याती ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी आहे. जवळपास 35 हजार विद्यार्थी ऊस तोडणीसाठी आपल्या आई-वडिलांसोबत कारखान्यात गेलेले आहेत. याविषयी बीडचे शिक्षणाधिकारी यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
काय म्हणाले शिक्षणाधिकारी? काही नागरिक न्यायालयात गेले आहेत असे विचारल्यानंतर शिक्षणाधिकारी म्हणाले की, बीड जिल्ह्यातील आकडेवारी ही जिल्ह्यातील शाळांकडून आलेली आकडेवारी आहे. त्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर आम्ही तपासलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये चूक असेल, त्यामध्ये जन्मतारीख असेल किंवा नावामध्ये काही बदल असेल किंवा नावात दुरुस्ती काम सध्या चालू आहे. हे आधार कार्ड बोगस जोडलेले आहेत, असे सांगितले जात आहे. याविषयी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता त्याबद्दल काही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही आणि असा प्रकार घडलेलाच नाही असे शासकीय उत्तर मिळाले.
'त्या' विद्यार्थ्यांचे काय होणार? बीड जिल्ह्यातील वास्तव फारच गंभीर आहे. शाळेमध्ये असलेल्या अकरा ते बारा हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसतील तर बीड जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी गेलेले जवळपास 35 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असतील का? असासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. जे मुले ऊसाच्या फडामध्ये आहेत त्यांचे आधार कार्ड असतील का...? बीड जिल्ह्यामध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसतील तर ही गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे, ही मुले पटसंख्यावरील आहेत. हजारो मुले आहेत की, जी वीटभट्टीवर कार्यरत आहेत. यांच्या आधार कार्डचे काय...? संबंधित पालकांनी आणि शासकीय यंत्रणेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. ती कमी व्हायला हवी आहे, हे आर्थिक वर्ष संपत आले आहे, तरी मुलांचे आधार कार्ड निघालेले नाहीत. ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली पाहिजे.
हेही वाचा:Nanded Accident 5 Dead : ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक, पाचजण जागेवर ठार