महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी - बीड अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दीड वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील आरोपी विकास साहेबराव साबळे याने आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी
अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी

By

Published : Nov 29, 2019, 5:17 PM IST

बीड -अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना बीड येथे घडली होती. या प्रकरणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अंजू एम. शेंडे यांच्या पीठाने हा निकाल दिला.


दीड वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील आरोपी विकास साहेबराव साबळे याने आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यात विकास साबळे विरुद्ध तक्रार दाखल केली.

हेही वाचा - 'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'
शिरूर कासार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहबूब रहमान काजी यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपी विकास साबळे यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून दहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाकडून न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्याचा आधार आधार घेत न्यायालयाने आरोपी साबळेला शिक्षा सुनावली, अशी माहिती सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details