जायकवाडीतून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू; बीडकरांना मिळणार दिलासा - माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी
जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणात 400 क्यूसेक इतक्या क्षमतेने पाणी सोडले जात आहे. जायकवाडीचे पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू
बीड - जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी सोडणार आहेत. यातील अडीच टीएमसी. पाणी तत्काळ माजलगाव धरणात दाखल होणार आहे. सध्या 400 क्यूसेक इतक्या क्षमतेने हे पाणी सोडले जात आहे. उर्वरित पाणी टप्या-टप्याने सोडले जाणार आहे.
जायकवाडी धरणामधून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू
बीड जिल्ह्या पावसाविना कोरडा आहे. त्यामुळे माजलगाव धरणामध्ये नवीन पाण्याची आवक नाही. जायकवाडीचे पाणी कालव्याद्वारे माजलगाव धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. किमान 3 टीएमसी पाणी सोडा, अशी क्षीरसागरांची मागणीहोती. मात्र जायकवाडीमध्ये होणारी पाण्याची आवक आणि लोकभावना डोळ्यासमोर ठेवून माजलगाव धरणात 10 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. सध्या 400 क्यूसेस इतक्या क्षमतेने अडीच टीएमसी पाणी सोडले जात आहे. 48 तासांत ते माजलगाव धरणात पोहोचेल.