बीड - जिल्ह्यातील बीडसह परळी, अंबाजोगाई केज व आष्टी ही शहरे 12 ते 21 ऑगस्टपर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे. याबाबतचा आदेश रविवारी काढला. आज घडीला बीड जिल्ह्यात चौदाशेहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीड जिल्ह्यातील पाच शहरे बुधवारपासून 10 दिवसासाठी पुन्हा लॉकडाऊन - बीड कोरोना बातम्या
एकीकडे संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र जिल्हा प्रशासन लॉकडाऊन ची भूमिका घेत असल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांची प्रचंड प्रमाणात आर्थिक कोंडी होत आहे.
एकीकडे संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र जिल्हा प्रशासन लॉकडाऊन ची भूमिका घेत असल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांची प्रचंड प्रमाणात आर्थिक कोंडी होत आहे.
रविवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड शहरासह परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी ही शहरे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येताच तत्काळ व्यापार्यांची अँटीजन टेस्ट सुरू करण्यात आली. यामध्ये 88 पेक्षा अधिक व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. बीड जिल्ह्यात सामूहिक संसर्ग पसरला आहे. त्यामुळे संक्रमण तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन लॉकडाऊन ची भूमिका घेत आहे. मात्र, दुसरीकडे हातावर पोट असलेले छोटे - छोटे व्यापारी लॉकडाउनला वैतागले आहेत. ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात आहे.