बीड -दुचाकी आणि सायकलच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पाटोदा ते रायमोहा मार्गावर घडली. रमेश बबन मिसळ (वय, 28 वर्ष रा. खोकरमोहा ता. शिरूर) असे मृताचे नाव आहे.
दुचाकी-सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू - 1 died 1 injured on road accident in beed
दुचाकी आणि सायकलच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पाटोदा ते रायमोहा मार्गावर घडली. रमेश बबन मिसळ (वय, 28 वर्ष रा. खोकरमोहा ता. शिरूर) असे मृताचे नाव आहे.
दुचाकी-सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू
रमेश बबन मिसळ हे पाटोद्यावरून गावी रायमोहा येथे आपल्या दुचाकीवरून येत होते. यावेळी उंबर विहीरजवळ समोरून येणाऱ्या सायकलस्वरास चुकवीत असताना हा अपघात झाला. यामध्ये मिसळ हा गंभीर जखमी झाला होत. त्याला रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. सायकलचालक जखमी झाला असून, जखमी त्याचे नाव समजू शकले नाही.