वैजापूर (औरंगाबाद) : औरंगाबादच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसशी सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाची तयारी केलेल्या जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश सध्या लांबणीवर पडला आहे. राज्यात विधान परिषद निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पक्षनेतृत्व अजित पवार गुंतल्याचे कारण देत बुधवारी मुंबईत होणारा नियोजित प्रवेश समारंभ आठ दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्यामुळे ठोंबरे समर्थकांचा मोठी गोची झाली आहे. मागील दोन दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे ठोंबरे समर्थ अचानक मात्र थंडे झाले आहे हे विशेष. दुसऱ्या बाजूने या प्रवेशाला जोरदार विरोधात उतरलेल्या माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर समर्थकांचे मुख मात्र ठोंबरेंचा प्रवेश सोहळा लांबल्यामुळे आनंदाने द्विगुणीत झाले आहे.
जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरेंंचा राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर टांगती तलवार? - वैजापूर जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे
सोशल मीडियावर ठोंबरे समर्थक व चिगटगांववकर समर्थकामध्ये मागील दोन दिवसात चांगले युद्ध पाहायला मिळाले. पंकज ठोंबरे यांच्या समर्थकांनी अजित पवार व पंकज ठोंबरे या दोघांचे संयुक्त छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून “आमचं ठरलंय’ या कॅप्शनसह ते फोटो जोरदार व्हायरल केले. यामुळे राष्ट्रवादीतील स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. पक्षनेतृत्वाकडे या प्रवेशाला विरोधाची भूमिका दाखवण्यासाठी तरुणांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे आग्रहाची भूमिका घेतली होती.
माजी आमदार चिकटगावकरांसह समर्थक मुंबईत ठाण मांडून..! -काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत औरंगाबादच्या वैजापूर चे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर समर्थकांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली होती. सोशल मीडियावर ठोंबरे समर्थक व चिगटगांववकर समर्थकामध्ये मागील दोन दिवसात चांगले युद्ध पाहायला मिळाले. पंकज ठोंबरे यांच्या समर्थकांनी अजित पवार व पंकज ठोंबरे या दोघांचे संयुक्त छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून “आमचं ठरलंय’ या कॅप्शनसह ते फोटो जोरदार व्हायरल केले. यामुळे राष्ट्रवादीतील स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. पक्षनेतृत्वाकडे या प्रवेशाला विरोधाची भूमिका दाखवण्यासाठी तरुणांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे आग्रहाची भूमिका घेतली होती. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सभापती भागीनाथ मगर,मा. उपसभापती प्रभाकर बारसे तालुकाध्यक्ष प्रताप निंबाळकर, युवा नेते अजय पाटील चिकटगावकर, यांनी राजेश टोपे यांची घनसावंगी येथे भेट घेत संभाव्य पक्ष प्रवेश रद्द करण्याची मागणी केली होती.
कोण आहेत पंकज ठोंबरे? -औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे यांचे पंकज ठोंबरे पुतणे आहेत. जिल्हा परिषद वांजरगाव गटाचे ते सदस्य आहेत. पक्ष संघटनेत तालुका युवक काँग्रेस ते जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे आहे.