महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जाधववाडी बाजारात युवकाचा दगडाने ठेचून खून - औरंगाबाद हत्या

दगडाने ठेचून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील जनरल शॉपिंग सेंटरच्या छतावर युवकाचा मृतदेह आढळून आला.

aurangabad murder
aurangabad murder

By

Published : May 21, 2021, 9:26 PM IST

औरंगाबाद - दगडाने ठेचून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील जनरल शॉपिंग सेंटरच्या छतावर युवकाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती ३५ ते ४० वयागटातील असून अद्याप त्याची ओळख पटू शकली नाही. ओळख पटविण्याचे तसेच खून कोणी व का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधववाडी येथील बाजार समिती आवारासमोरील भागात जनरल शॉपिंग सेंटर आहे. या सेंटरच्या १२५, १२६ गाळ्यावरील छतावर सकाळी काही लोक नेहमीप्रमाणे लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह दिसला. टेरेसवर दोन व्यक्ती गेल्याचे येथील सुरक्षा रक्षक दिलीप बोर्डे यांच्या नजरेस येताच त्यांनी त्यांना हकलून लावण्यासाठी धाव घेतली त्यावेळी युवकाचा मृतदेह त्याच्या नजरेस पडला. त्यांनी तातडीने अन्य सुरक्षारक्षकांना बोलवून घेत घटनास्थळावरुन अन्य लोकांना दूर केले तसेच सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ इंगळे यांना घटनेची माहिती दिली.

माहिती समजताच पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, सिडको पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अरबाड, ज्ञानेश्वर अवघड, फौजदार बाळासाहेब आहेर, रनसिंग पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत पंचनामा केला. मारेकऱ्यांनी सिमेंटचा गट्टू युवकाच्या डोक्यात मारुन हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मारेकरी व मृत हे परस्परांच्या ओळखीचे असण्याची शक्यता असावेत. गांजाच्या गोळ्या, पाण्याची बाटली तेथे आढळून आली असून नशापाणी करण्यावरुन वाद झाला व त्यातूनच हा खून करण्यात आला असावा, असा कयास बांधला जात आहे. तसेच श्नान पथकास तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

घटनास्थळी आढळली चिल्लर..

दरम्यान, घटनास्थळी ७ ते ८ रुपयांचे चिल्लर पैसे, एका गठड्यात बांधलेले काही कपडे व चप्पल आढळून आले. अद्याप मृताची ओळख पटली नाही. ओळख पटविण्यासाठी तसेच खून कोणी व कशासाठी केला याचा तपास सिडको पोलीस करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी -

ज्या संकुलाच्या छतावर ही घटना घडली. त्यावर समितीचे एक कार्यालय आहे. परंतु छतावर लोकांनी अक्षरश: शौचालय बनवले आहे. खुनाची ही घटना रात्री घडली असावी, अशी शक्यता असून समिती आवारातील कृषी उत्पन्न बाजार आवारात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. परंतु घटनास्थळ असलेल्या संकुलाच्या मागील बाजूने कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलीस करत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details