औरंगाबाद- बेरोजगारीला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास नारेगाव भागात घडली आहे. भारत अशोक खरात (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
बेरोजगारीला कंटाळून २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या - भारत अशोक खरात
बेरोजगारीला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भारत अशोक खरात (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृतक भारत अशोक खरात याचे छायाचित्र
मृत भारत हा कंपनी कामगार होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून हाताला काम मिळत नसल्याने त्यास घर चालवणे कठीण झाले होते. काही दिवसांपासून तो आर्थीक विवंचनेत होता. मंगळवारी रात्री तीन वाजेपर्यंत भारत हा शेजारी असलेल्या जागरण गोंधळामध्ये गेला होता. त्यानंतर घरी आल्यावर त्याने त्याच्या खोलीतील छताला दोरी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी एम.आय.डीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.