महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Firing On Samrudhi Highway Aurangabad : समृध्दी महामार्गावरवर फायरिंगचा व्हिडिओ बनविणारा युवक अटकेत; बंदूक निघाली खोटी

समृद्धी महामार्गावर हातात बंदूक घेऊन व्हिडिओ (video of firing on Samrudhi highway) बनविणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतला (youth arrested ) आहे. व्हिडिओ करण्यासाठी हातात खोटी बंदूक घेऊन समाज माध्यमांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने (Attempts create terror on social media) त्याच्यावर गुन्हा दाखल (case registered against armed youth) केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देण्यात आली. (Latest news from Aurangabad)

Firing On Samrudhi Highway Aurangabad
फायरिंगचा व्हिडिओ बनविणारा युवक अटकेत

By

Published : Dec 21, 2022, 5:48 PM IST

समृद्धी महामार्गावरील हाच तो फायरिंग व्हिडीओ

औरंगाबाद :14 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे फुलंब्री अंतर्गत येणाऱ्या समृध्दी महामार्गावरील बोगद्याजवळ रोजी एक व्यक्ती चारचाकी वाहनाने आला. (Aurangabad Crime) सिनेस्टाईल चालत आला. यानंतर त्याने त्याच्या जवळील बंदुकीतून हवेत फायरिंग (video of firing on Samrudhi highway) करून दहशत पसरवत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. (Attempts create terror on social media) नमूद व्हिडीओच्या अनुषंगाने त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुरंन 390/22 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल (case registered against armed youth) करण्यात आला होता. (youth arrested )

पोलिसांनी जप्त केलेले शस्त्र

युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात : पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सदर घटनेची गांर्भीयाने दखल घेऊन व्हिडीओतील व्यक्ती व त्याने वापरलेले शस्त्र यांचा शोध घेण्याची सुचना फुलंब्री व गुन्हे शाखा पोलीस पथकांना दिल्या. यावरुन पोलीस व्हिडीओतील व्यक्तीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने त्यास पोलीसांचे पथकाने त्यास ताब्यात व विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने त्याचे नाव चंद्रकांत कैलास गायकवाड उर्फ बाळु गायकवाड (रा. बेगमपुरा, औरंगाबाद) असल्याचे सांगितले. सोशल मिडीयावर प्रसारित केलेल्या त्याच्या व्हिडीओतील बंदूक बाबत सखोल चौकशी करता, त्याने नमूद व्हिडीओ बनविण्याकरिता मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची खेळणीतील बंदूक वापरली असून व्हिडीओ एडिटिंग करणाऱ्या मित्राच्या सहाय्याने त्या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साऊंड देऊन बनविला असल्याचे कबुल केले.

बंदूक निघाली खोटी : व्हिडीओ एडिटिंग करणाऱ्या त्याच्या मित्राची तपास पथकाने कसून चौकशी करता, त्याने आरोपीच्या व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साऊंड देऊन तयार केल्याचे मान्य केले. मूळ व्हिडीओतील बदलांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यातील व्हिडीओतील वापरलेली बंदुकीची सत्यता तपासले असता त्यांने व्हिडीओमध्ये वापरलेले बंदुक ही मुलांचे खेळण्यातील असून, व्हिडीओला स्पेशल इफेक्ट व साउंड देऊन बनविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

असे कृत्य पडेल महागात : पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी आवाहन केले आहे कि, अशा प्रकारे सोशल मिडियावर स्टंटबाजी करून, धोकादायक शस्त्रांसह फोटो काढुन, समाजात दहशत पसरविणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. युवकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये. प्राणघातक शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणारी कृत्ये करून त्याचे व्हिडीओ, फोटो, सोशल मिडियावर व्हायरल करु नये. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा यांची विशेष नजर असून अशा व्यक्तींला सक्त व कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा पोलिसांनी दिला.

या अधिकाऱ्यांचा तपासात सहभाग : नमुद गुन्हयांचा तपास मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र निकाळजे, श्री. श्रीनिवास धुळे, पोलीस उप निरीक्षक,पोलीस अंमलदार आनंद पांचगे, कौतिक चव्हाण, साळवे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details