औरंगाबाद -पडेगाव पॉवर हाऊसजवळझुडपांमध्ये एका तरुणाचा मृतदेहसापडला. हा २३ वर्षांचा तरुण असूनबेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
पडेगाव पॉवर हाऊसजवळील मोकळ्या जागेत सकाळी काही नागरिक प्रात:विधीसाठी गेले असता एक विवस्त्र तरुण जखमी अवस्थेत झुडुपात पडलेला दिसला. ही माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्यासह फॉरेन्सिक तपासणी पथक, श्वान पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.