वैजापूर : राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी वर्षभरात तीन व पाच वर्षांत नऊ अपघात झाल्यावर तो ‘ब्लॅक स्पॉट’ ठरविला जातो. मात्र, तालुक्यातील खंडाळा येथील पाची पुलाजवळ रस्त्याचे उद्घाटना होण्यापूर्वीच तब्बल २२ पेक्षा अधिक लहान- मोठे अपघात झाले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. हा ‘ब्लॅक स्पॉट’ काढण्यासाठी आणखी किती बळींची वाट पाहिली जात आहे? असा संतप्त सवाल वाहनधारक उपस्थित करत होते. अखेर शुक्रवारी रात्री 'राष्ट्रीय महामार्ग'चे अभियंता ( National Highways Authority Executive Engineer ) व गंगामाई कन्स्ट्रक्शनच्या ( Gangamai Construction ) गुत्तेदारावर वैजापूर पोलिस ठाण्यात ( Vaijapur Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे.
'तो' स्पॉट ठरतोय जीवघेणा
शिऊर- नांदगाव महामार्गावरून वेगाने येणारी अवजड वाहने आणि स्थानिक वाहनांचा ओघ, अशा कात्रीत असलेल्या वैजापूर- औरंगाबाद मार्गावर खंडाळा येथील पाची पुलावर ब्लॅक स्पॉट झाला ( Black Spot On Aurangabad Highway ) आहे. याच जीवघेण्या स्पॉटवर दोन दिवसात तीन अपघात झाले. यापैकी एका अपघातात भोपळेवाडी (ता. कन्नड) येथील समाधान गोविंद आहीरे (वय ४३) या तरुणाचा जागेवर बळी ( Youth Died In Accident ) गेला. ते चांडगाव येथून गावाकडे जात होते. त्यावेळी खंडाळा येथील पाची पुलावर असलेल्या दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाल्मीक समाधान आहिरे रा. भोपळेवाडी, ता.कन्नड यांनी शुक्रवारी रात्री वैजापूर पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली.