महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून इंजिनियर तरुणाची आत्महत्या, पैठण तालुक्यातील घटना - Nikhil Chaudanle engineer commit suicide

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निखिल दत्तात्रय चौडांळे (रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

young engineer commit suicide Pimpalwadi
निखिल चौडांळे आत्महत्या पिंपळवाडी

By

Published : Apr 5, 2022, 10:06 AM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. निखिल दत्तात्रय चौडांळे (रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. निखलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तर, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा -वैजापुरात विभागीय आयुक्तांकडून अचानक झाडाझडती; घाणीचे साम्राज्य पाहून तहसीलदारासह अधिकाऱ्यांवर संतापले

पैठण येथे होता नौकरीला :मूळचा पंढरपूर येथील निखिल चौडांळे याने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे, तो पिंपळवाडी येथील आदर्शनगरमध्ये राहत होता. दरम्यान सोमवारी सकाळी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच निखिलचे नातेवाईक पंढरपूर येथून पैठण येथे दाखल झाले आहेत.

प्रेम प्रकरणातून आत्महत्या? :निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्र आढळून आली आहेत. एका प्रेमपत्रात ”तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना” अशी हिंदी चित्रपटातील गाण्याची ओळ लिहिण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच, युवकाने आत्महत्या का केली? त्याचे प्रेमसंबंध होते का? या बाबत पोलीस माहिती घेत आहेत.

हेही वाचा -International book day : उद्याचा चांगला नागरिक घडवायचा असेल तर स्मार्ट सिटीत बाल ग्रंथालये गरजेचे - ज्येष्ठ बाल साहित्यिक लीला शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details