औरंगाबाद- चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 17 मार्च) घडली होती. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणाने गळफास घेतला; उपचारादरम्यान मृत्यू - औरंगाबाद शहर बातमी
चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 17 मार्च) घडली होती. त्याचा उपचारा दरम्यान शनिवारी (दि. 27 मार्च) मृत्यू झाला.
अमोल भिमाराज गरुड (वय 27 वर्षे), असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. अमोल हा चौधरी कॉलनी चिकलठाणा राहत होता. बुधवारी सहा वाजता (ता. 17 वर्षे) घराच्या वरच्या मजल्यावर सिलिंगला हुकाला साडीच्या साहायाने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी अमोल याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान उपचार सुरू असताना शनिवारी (ता.27 वर्षे) सकाळी आठच्या सुमारास अमोल गरुड याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -मद्यधुंद मोटाराचलकाची पोलिसाला मारहाण, आरोपी अटकेत