महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये सव्वा लाखांचा गुटखा जप्त, एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई

एका कारमधून वाहतूक करण्यात येणारा १ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सापळा रचून पकडला. हा गुटखा व ३ लाख रुपयांची कार व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

aurangabad
वाळूज पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

By

Published : Dec 22, 2019, 10:33 AM IST

Updated : Dec 22, 2019, 11:17 AM IST

औरंगाबाद -एका कारमधून वाहतूक करण्यात येणारा १ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने पकडला. सचिन रामजी जाधव (२२) राहणार श्रीराम नगर रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे.

वाळूज पोलिसांनी पकडला सव्वा लाखांचा गुटखा

गुटखा, पान मसाला तसेच सुगंधी तंबाखूवर राज्यात प्रतिबंध आहे. असे असताना वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. शनिवारी सकाळी एमायडीसी वाळूज पोलिसांना एका कारमधून गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बाबा इंजिनिअरिंग कंपनीजवळील चौकात सापळा रचला.

हेही वाचा - धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

साडेदहाच्या दरम्यान त्यांना जोगेश्वरीकडून १ कार (एमएच ०४ जीडी ३४५२) भरधाव वेगात येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये सुगंधित पान मसाल्याचे ८०० पाकिटे व जर्दाची ८०० पाकिटे असा १ लाख ३२ हजारांचा गुटखा आढळला. पोलिसांनी हा गुटखा व ३ लाख रुपयांची कार व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्सना जाधव यांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला रुग्णाच्या नातेवाईकांकडून जबर मारहाण

Last Updated : Dec 22, 2019, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details