औरंगाबाद - विवाहित महिलांचा जसा सासरी छळ होतो. तसाच छळ विवाहित पुरुषांचाही बायकोकडून होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. कोरोना काळात पत्नीपीडित पुरुषांच्या ३५० तक्रारी आहेत. मात्र या केवळ १० टक्के तक्रारी असल्याचे पत्नीपीडित संघटनेचे मत आहे. ९० टक्के पुरुष समाज काय म्हणेल, या भीतीपोटी पत्नीविरोधात तक्रार न करता निमूटपणे त्रास सहन करीत राहतो. पीडित पतीच्या वाढत्या तक्रारी पाहता महिलांच्या कायद्याप्रमाणे पुरुषांच्या बाजूने देखील कडक कायदा असावा, अशी मागणी आता वकीलांसह सामाजिक कार्यकर्ते करत आहे.
पुरूषांचा छळ वाढला -
विवाहित पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून भांडणे होतात. या भांडणाचे रूपांतर हाणामारीपर्यंत जाऊन प्रकरण पोलिसांपर्यंत जाते. यातून त्यांचा संसार तुटण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रकरण पोलिसांच्या भरोसा सेलकडे पाठविले जाते. भरोसा सेलचे अधिकारी, कर्मचारी जोडप्याला बोलावून त्यांचे समुपदेशन करतात. या समुपदेशनाला ८० टक्के यश येते आणि जोडप्यांचे मनोमिलन होऊन तुटण्याच्या मार्गावरील संसाराची वेल पुन्हा बहरू लागते. उर्वरित प्रकरणांत तडजोड न झाल्यास विवाहित पत्नी सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविते आणि न्यायालयात पोटगीचा दावा दाखल करते. विवाहित महिलांप्रमाणेच आता विवाहित पतीकडूनही पत्नीविरोधात छळाच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. दीड वर्षाच्या कालावधीत ३५० पुरुषांचा पत्नी छळ करते. मारहाण करते, शिवीगाळ करते. आई-वडिलांना चांगली वागणूक देत नाही तसेच विवाहबाह्य संबंध आहेत, अशा तक्रारी आहेत.
घटस्फोटात आईचा हस्तक्षेप जास्त -